रविवार, १८ जानेवारी, २००९

अधिरथ :

हा व्यक्ती राजा ययाती आणि चित्र्रथ ह्यांच्या कुळातला होता . चित्र्रथ चे दुसरे नाव रोमपाद . हा रामायण कालीन राजा असून महर्षी ऋश्याशृंग ह्यांचा सासरा! असो तर हा अधिरात राजा महाराज शंतनू ह्यांचा सारथी आणि ह्याच्या बायको चे नाव राधा [ कृष्णा ची राधा नव्हे] होत . एक दिवस गांगेत आंघोळ करतांना ह्या जोडप्याला एक दिव्या बालक लाकडीच्या पेटीत नदीत सापडला . त्या बालकाचे नाव राधेय असे रूढ झाले पुढे महर्षी द्रोणाचार्यंनी ह्याला त्याचे दिव्य कुण्डल बघून 'कर्ण' नाव दिले.

पुढे वृद्धात्वा मुळे त्याचा कार्य भार संजय ला सोपवण्यात आल.

अधिरथ बद्दल तशी फारशी माहिती नाही , परंतु रणजीत देसाई ह्यांच्या द्वारे लिखीत कादंबरी राधेय ह्यात त्याचा [अधिरथ] अंत रथा च्या अपघाता मधे झालेला सांगण्यात आलेला आहे. तसेच मृत्तयुंजय कादांबारित अधिरथ कर्ण ला असे सांगतो की शेवटचा कुरु तोच आहे.

तस बघितल तर दोन्ही कादांबारित केलेल्या ह्या उल्लेखांचा दुवा मूळ महाभारतात सापडत नाही. पण ह्या मुळे अधिरथ सारथ्याचे महत्व काही कमी होत नाही हे नक्की.

२ टिप्पण्या:

  1. अधिरथ ययातीच्या कुळातील असल्याचा काहीहि उल्लेख महाभारतात नाही. ययाती हा कौरव-पांडवांचा पूर्वज. अधिरथाचा नव्हे. अधिरथ सूत होता. क्षत्रिय नव्हे. कादंबरीलेखक कल्पनास्वातंत्र्य घेतात. पण ते सत्य नाही.

    उत्तर द्याहटवा

 
click here for a free hit counter
free hit counter