रविवार, १८ जानेवारी, २००९

अधिरथ :

हा व्यक्ती राजा ययाती आणि चित्र्रथ ह्यांच्या कुळातला होता . चित्र्रथ चे दुसरे नाव रोमपाद . हा रामायण कालीन राजा असून महर्षी ऋश्याशृंग ह्यांचा सासरा! असो तर हा अधिरात राजा महाराज शंतनू ह्यांचा सारथी आणि ह्याच्या बायको चे नाव राधा [ कृष्णा ची राधा नव्हे] होत . एक दिवस गांगेत आंघोळ करतांना ह्या जोडप्याला एक दिव्या बालक लाकडीच्या पेटीत नदीत सापडला . त्या बालकाचे नाव राधेय असे रूढ झाले पुढे महर्षी द्रोणाचार्यंनी ह्याला त्याचे दिव्य कुण्डल बघून 'कर्ण' नाव दिले.

पुढे वृद्धात्वा मुळे त्याचा कार्य भार संजय ला सोपवण्यात आल.

अधिरथ बद्दल तशी फारशी माहिती नाही , परंतु रणजीत देसाई ह्यांच्या द्वारे लिखीत कादंबरी राधेय ह्यात त्याचा [अधिरथ] अंत रथा च्या अपघाता मधे झालेला सांगण्यात आलेला आहे. तसेच मृत्तयुंजय कादांबारित अधिरथ कर्ण ला असे सांगतो की शेवटचा कुरु तोच आहे.

तस बघितल तर दोन्ही कादांबारित केलेल्या ह्या उल्लेखांचा दुवा मूळ महाभारतात सापडत नाही. पण ह्या मुळे अधिरथ सारथ्याचे महत्व काही कमी होत नाही हे नक्की.

प्रस्तावना

मित्र आणि वाचक हो , रामयण अणि महाभारत हे भारताचे दोन अति पुरातन अणि जग प्रसिद्ध महाकाव्य ज्यांच्या तुलनेत ग्रीक कवि होमर चे illiad अणि मेसपोतमिया चे एपिक ऑफ़ गिल्गेमाश अगदी उणे वाटतात असे हे महान पवित्र ग्रन्थ आहेत। असा कोण हिंदू असेल ज्याला रामायणातील प्रभु राम माता सिता ची व्यक्तिरेखा अणि महाभारतातले कौरव पांडव अणि श्री कृष्ण माहिती नसतील? तसे पाहिले तर रामायण अणि महाभारतात अशे अनेक चरित्र आहेत की जी लोकांना माहिती नाहीत परन्तु रामायण अणि महाभारतात त्यांच्या महत्वपूर्ण सहभाग होता। असो , तर हा ब्लॉग मी ह्या करता सुरु केला आहे कि आपल्या वाचकांना कही नविन माहिती ह्या तुन कळेल।
तर माझ्या ह्या ब्लॉग वर मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो , हा माझा पहिला मराठी ब्लॉग अस्ल्यामुले शुद्ध लेखनाच्या चुकीनकड़े कृपया दुर्लक्ष करावे । आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात तस मला आणखी लिहिण्याचा हुरूप येईल
 
click here for a free hit counter
free hit counter